स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम
बीडकरांनी सहकुटुंब उपस्थित राहून लाभ घ्यावा-गौतम खटोड
बीड । वार्ताहर
अधिकमास अर्थात पुरुषोत्तम मासानिमित्त बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने गौतम खटोड यांनी दिली आहे. सर्व बीडकरांनी या कीर्तन महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी पत्रकातून केले आहे.
याबाबत माहिती देताना गौतम खटोड यांनी सांगीतले की, दि.18 जुलै 2023 रोजी पुरूषोत्तम मास (अधिकमास) सुरू होतो आहे. ही पर्वणी तीन वर्षांत एकदा येते. दान, कथा किर्तन, नाम, जप अधिक अधिक या अधिकमासामध्ये करण्याची परंपरा आहे. अशा या पावन मासानिमित्त बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्यातर्फे दि.18 ते 25 जुलै या सात दिवसीय कथा, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे दहा किर्तनकार आपली सेवा देणार आहेत. तसेच दोन संगीतमय कथा होणार आहेत. महाभारत कथेतील ठळक वैशिष्ट्ये या कथेचे निरुपण शंकर महाराज शेवाळे हे करणार आहेत. तसेच श्रीकृष्ण लीलामृत या विषयावर आधारित कथेचे निरूपण ह.भ.प. श्री केशव महाराज उखळीकर हे करणार आहेत. बीड शहरासह परिसरातील भावीक भक्तांनी या कथा किर्तन श्रवणाचा सहकुटूंब लाभ घ्यावा. सकाळी 10 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.
Leave a comment