बीड | वार्ताहर

बीड तालुक्यातील मौजे.अंजनवती येथील येडे वस्ती स्थित श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात आज 26 एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला. प्रतिकार करणाऱ्या दोन महिलांना मारहाण केली. त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नेकनूर पोलिस  घटनास्थळी ठाण मांडून असुन स्थानिक गुन्हे शाखा व श्वानपथक यांनी पाहणी केली. पुढील तपास नेकनूर ठाण्याचे एपीआय शेख मुस्तफा करत आहेत.

घरात झोपलेले पुजारी कृष्णा जोशी यांच्या रूमला बाहेरून कडी लावली त्याचवेळी शेजारच्या रूममध्ये झोपलेल्या कृष्णा जोशी यांच्या पत्नी गीता जोशी (वय ४५) यांच्या डोक्यात मारहाण केली.डोळ्याखाली जखम असुन सासु उषा प्रल्हाद लेले यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे डोक्याला मारहाण केली त्यांच्यावर बीड येथील फिनिक्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.दीड तोळे सोने व काही रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

नेकनुर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शेख मुस्तफा, पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, हवालदार राख तसेच लिंबागणेश पोलिस चौकीचे नागरगोजे, हवालदार सचिन डिडुळ घटनास्थळी ठाण मांडून असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय दुलत व त्यांची टीम तसेच श्वानपथक दाखल झाले असून पुढील तपास शेख मुस्तफा करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.