जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची माहिती

बीड । वार्ताहर

 

बीड शहरातून वाहणार्‍या बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेसाठी नगरपालिका प्रशासनासह मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 7 जानेवारी व 14 जानेवारी रोजी सलग दोनदा ही मोहीम राबविण्यात आली आहे.या मोहिमेदरम्यान जवळपास 1000 टन कचरा काढण्यात आला असून नदीच्या स्वच्छतेसाठी सोमेश्वर मंदिर पुलाजवळील भाग व दगडी पुलाजवळील बराचसा भाग स्वच्छ करण्यात आला आहे. त्यानंतर आता आज शनिवारी दि.21 जानेवारी रोजी तिसर्‍यांदा ही मोहिम वेगाने राबवली जाणार आहे. सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळेत होणार्‍या मोहिमेत नागरिक व स्वयंसेवी संस्था देखील सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले.

 


बीड जिल्हाधिकारी कार्यालयात 20 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, सलग तिसर्‍यांदा शनिवारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग जिल्हा परिषद विविध कर्मचारी संघटना यांचा देखील भविष्यात सहभाग घेतला जाईल. लोकसहभागाबरोबरच शासकीय निधीची तरतूद देखील यासाठी केली जात आहे. त्यासह नागरिक देखील योजनेसाठी निधी देऊन सहभागी होऊ शकतात. स्वतंत्र बँक अकाउंट निर्माण करण्यात आले आहे. याचा खाते नंबर 50100547777288 असा आहे. दरम्यान आज शनिवारी तिसर्‍यांदा ही मोहीम राबविण्यात येणार आहे ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे तेव्हाच कचरा टाकण्याची सवय दूर होऊ शकते. नदीची कचरा व प्रदूषणातून मुक्तता होऊ शकते असे ते म्हणाले. तसेच स्वच्छता मोहीम नंतर भविष्यात नदीच्या काठावर सुंदर विकसित जॉगिंग ट्रॅक, फूटपाथ आदी सुविधा निर्माण करता येऊ शकतात. नदीच्या पाण्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी जाळी (फेंन्सिंग) सुद्धा करता येऊ शकते. शहराच्या सुंदरतेमध्ये या गोष्टी भर घालतील असा विश्वास जिल्हाधिकारी शर्मा यांनी व्यक्त केला.याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांनी मोहिमेबाबत सादरीकरण केले तर मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी मोहिमेसाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाबद्दल माहिती दिली.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.