जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलासाठी उपोषण करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

बीड | वार्ताहर

बीड जिल्हाधिकारी आणि त्यांचे प्रशासन किती हईगईपणे कारभार हाकत आहे याची प्रचिती आज जिल्हा वासियांना आली आहे. घरकुलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या एका व्यक्तीचा उपोषण स्थळीच मृत्यू झाला. आज दि. ४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.यामुळे
लालफितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती बेफिकीरपणे कामकाज चालवत आहे हे स्पष्ट झाले आहे आजच्या घटनेमुळे प्रशासनाविषयी जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.

हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

आप्पाराव भुजाराव पवार असे मयताचे नाव आहे. ते  वासनावाडी येथील रहिवासी गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी पवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते मात्र या उपोषणावरती व्यक्तीची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही. नेमकं जिल्हाधिकारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या कामात व्यस्त होते हे कळायला मार्ग नाही दरम्यान पवार यांचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पवार यांचा मृतदेह दोन ते तीन तास उपोषण स्थळीच होता. ना तिथे पोलीस आले ना, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जिल्हा प्रशासनातील अधिकारी. पवार यांच्या मृत्यूला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वारंवार निवेदने आणि अर्ज देऊन देखील त्यांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.