पाटोदा | वार्ताहर

पाटोदा मांजरसुंभा रोड अहमदपूर-अहमदनगर मार्गावर बामदळे वस्ती येथे टेम्पो-स्विफ्टचा अपघात झाला असून यामध्ये चौरे ( कुटे) कुटुंबामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

बामदळे वस्ती जवळ स्विफ्ट डिजायर मधील चौरे ( कुटे) परिवार लग्नासाठी केजकडे जात होते .पाटोदा मांजरसुंबा रोडवरील बामदळे वस्ती जवळ स्विफ्ट कार (क्र. एम.एच.१२के.एन ९७६१)  व आयशर टेम्पोचा (क्र. एम.एच.२६ बी.ई.५९४५) अपघात झाला.टेम्पो व डिवायडरच्यामध्ये कार अडकलेली होती. कारमधील लहान मुलासह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

 

पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जीवाचीवाडी (ता. केज) येथे जात असताना पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सातच्या दरम्यान मांजरसुंबाच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पो व पुणे येथून येणाऱ्या स्विफ्ट कारचा अपघात झाला.यामध्ये जिवाचीवाडी येथील रामहरी चिंतामणी कुटे (४०) त्यांच्या पत्नी सुनिता रामहरी कुटे (३५ ) मुलगा ऋषिकेश रामहरी कुटे , आकाश रामहरी कुटे, मुलगी प्रियंका रामहरी कुटे, राधिका सुग्रीव केदार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, आयशर टेम्पो व डिवायडरमध्ये स्विफ्ट कार घुसल्याने स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हजर झाले होते. सर्वांनी मिळून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.