6 जुलै रोजी संत प्रणवमुनीजींसह प.पू.किरणसुधाजी महाराजांचे बीडमध्ये आगमन



बीड । वार्ताहर

 



 

बीड शहरात यंदाच्या वर्षीच्या सकल जैन समाजातील पवित्र अशा चातुर्मास महोत्सवात येत्या 13 जुलै 2022 पासून प्रारंभ होत आहे. या चातुर्मासासाठी साध्वी आदि ठाणा 8 व संतांचे शहरात 6 जुलै रोजी मंगल आगमन होत आहे. यानिमित्त 6 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर ही शोभायात्रा सकाळी 8.30 वाजता सुभाष रोड येथील अमृत मंगल कार्यालयात पोहचेल. तेथे आगामी चार महिने चातुर्मास महोत्सव संपन्न होणार असून याप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती चातुर्मास कमिटीच्या वतीने अशोक चांदमल लोढा यांनी दिली. याप्रसंगी चातुर्मास कमिटीचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.

जैन भवन एमआयएमच्या कार्यक्रमांना भेटते परंतू साध्वींच्या चातुर्मासाला का नाही?

समाजनेत्यांचा हेकेखोरपणा नडला; आपसातील संघर्ष चातुर्मासपर्यंत पोहोचला

बीड शहर सकल जैन समाज चातुर्मास महोत्सव 2022 निमित्त जैन संत प.पू.प्रज्ञामनिषी प्रणवमुनिजी म.सा. यांच्यासह विदर्भ सिंहनी प.पू.मानकंवरजी म.सा.तथा महाराष्ट्र प्रवर्तनी प.पू.प्रभाकंवरजी म.सा. यांची सुशिष्या साध्वी करुणामूती प.पू.किरणसुधाजी म.सा.तसेच तपतेजस्विनी प.पू.विशालप्रभाजी म.सा.,प.पू.प्रज्ञाजी म.सा.,प.पू.प्राचिश्री म.सा.,प.पू.प्रसन्नाजी म.सा.,प.पू.प्राप्तिश्रीजी म.सा.,प.पू.संस्कृतीजी म.सा.,प.पू.स्वीकृतिजी म.सा. आदि ठाणा 8 या सर्व संतांचा चतुर्विध संघ चातुर्मास 2022 साठी बीड श्री संघाला प्राप्त झाला आहे. या सर्व संतांचा चातुर्मासिक मंगल प्रवेश सोहळा येत्या बुधवार दि.6 जुलै 2022 रोजी बीड शहरात संपन्न होत आहे. यानिमित्त 6 रोजी सकाळी 7.30 वाजता शहरातील जालना रोड येथील राजेशकुमार हेमराब बंब (जैन पत्रा अ‍ॅन्ड सिमेंट डेपो) येथून शोभायात्रेस प्रारंभ होईल.ही शोभायात्रा जालना रोड, जिजामाता चौक, डि.पी.रोड, सहयोगनगर,सुभाष रोेडमार्गे सकाळी 8.30 वाजता अमृत मंगल कार्यालयात पोहचेल.याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री प्रा.सुरेशराव नवले, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आ.ओमप्रकाश पोकरणा, शेखर देसर्डा, बाळासाहेब धोका, दिलीप सुराणा, अशोक जैन (श्रीश्रीमाळ) यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सुदेशचंद सकलेचा, धरमचंद गादिया, प्रेमचंद कोटेचा, झुंबरलाल पगारिया, मिठालाल कांकरिया, गुलाबचंद सुराणा, बाबुसेठ (सतिश) लोढा, किशोसेठ कोटेचा, अभय वाकीकर,सुभाष मुथ्था, प्रकाश देसर्डा, आशिष जैन, नवरतनमल बेदमुथ्था, अशोकचंद पगारिया, चंद्रकांत चोरडीया, इंदरचंद कोटेचा, मदनलाल डुंगरवाल, नितीन बेदमुथ्था, सुभाष देसर्डा, संजय कोठारी, राजेश शिंगवी, सुरेश बेदमुथ्था, ईश्वरचंद कोठारी, सुभाष सुराणा, सुभाष बोरुदिया, जयचंद बाठीया, रसिकशेठ नहार, विजयराज सुराणा, सुभाषचंद कोटेचा, सचिन भंडारी, सुनील कोचेटा, सौ.डिंपल पगारिया,  राजेंद्र मुथ्था, विजय वाकीकर, घेवरचंद बाठीया, संतोष चोरडीया, डॉ.पारसमल नहार, रमेशचंद छाजेड, वैभव नहार, सुमतीलाल छाजेड, डॉ.गौतमचंद रुणवाल,कचरुलाल कुंकुलोळ, गौतम रुणवाल, दिलीप बाफना, दिलीप सुराणा, चंद्रकांत चोरडीया, निर्मल पगारिया या सर्व मान्यवरांसह सर्व श्रावक संघाचे (संघपती) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमानंतर  चातुर्मासिक प्रवेशाचा गौतमप्रसाद अशोक चांदमल लोढा (चौसाळकर) यांच्या वतीने होईल अशी माहिती सकल जैन समाज चातुर्मास मिटीच्या वतीने सर्व कमिटी पदाधिकार्यांनी दिली. या कमिटीत राजकुमार बंब, मदनलाल धोका, सुशीलकुमार खटोड, गौतम खटोड, उज्वल कोटेचा,प्रविण बोरा, मदनकुमार दुग्गड, प्रशांत बोरा, मनोज कोटेचा, चंदनमल बोरा, रामलाल राका, सुशील सुराणा, पारस संचेती, चंदुलाल बोथरा, सतीश कोटेचा, ललित अब्बड आदींचा समावेश आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.