प्रतिनिधी | बीड 

बीड शहरात 88 कोटींची रस्ते पूर्ण झाली असून शहरातील आणखी 15 नवीन रस्त्यांचे प्रस्ताव दाखल कंरण्यात आले असून लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊन ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आज दिली


पत्रकार परिषदेत माहिती देत असताना नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी नगर पालिकेच्या वतीने झालेल्या कामांची माहिती दिली तसेच जर रस्त्याच्या कामात कुठे चुका दिसुन आल्या तर त्या आमच्या  निदर्शनास आणु द्या. आम्ही तातडीने दुरूस्ती करू मागील डिपीआर मध्ये शहरातील नगरोत्थान महाअभियानात राज्य स्तरावर पहिला ८८ कोटी रूपये खर्च करून १६ रस्त्याची  कामे  मंजूर करून पूर्ण केली  असुन या कामामुळे बीड शहराचे सौंदर्य  वाढले असुन नागरिकांचा बीड नगर पालिकेवरील विश्वास वाढला आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही कधीच भेदभाव केला नाही आणि करणार नाही. विरोधकांच्या वार्डाचाही आम्ही विकास केला भेदभाव केला नाही.विकासात कधीच  राजकारण आडवे आणले नाही असे.नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलतांना सांगीतले.

बीड शहरातील एस के.एच मेडीकल कॉलेज येथील नवीन संस्था ऑफीसमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष  डॉ.भारतभुषण क्षीरसागर बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की बीड शहरात     महिलांसाठी शहरातील  राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळा परिसरात   जीम तयार केली आहे. या शिवाय शहरातील १४ ठिकाणी पुरूषांसाठी  खुल्या जीम तयार केल्या आहेत. त्याच बरोबर महिला बचत गटासाठी  शहरातील भाजी मंडई येथील आहिल्यादेवी होळकर सभागृहात बचत गटाचा मॉल सुरू केला आहे. काही जणांनी या ठिकाणी अनियमीता झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली परंतु तसे काही झालेले नसल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.पुढे बोलतांना डॉ. भारतभुषण क्षीरसागर म्हणजे की,  विरोधकांच्या वार्डात सुध्दा आम्ही विकास  कामे करतो आणि करत आहोत.आम्ही विकासकामात कधीच  राजकारण केले नाही.  विरोधातील नगरसेवकावर अन्याय केलेला नाही. सर्व शहरात डिपी आरमध्ये रस्ते मंजुर झाले आहेत. सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा नगररोड, बार्शीरोड हा रस्ता  सिमेंटचा का होत नाही. याकडे का दुर्लक्ष होत आहे याचा विचार करावा असे डॉ.क्षीरसागर यांनी सांगीतले .बीड नगर पालिकेवर प्रशासक येण्यापूर्वी बीड शहरातील १५ रस्त्यांना तांत्रीक मान्यता मिळाली  असुन हे पंधरा रस्ते  ९१ कोटी ७४ लाख रूपये किंमतीचे आहेत यामध्ये
बीड शहरात नगर परिषदेअंतर्गत डीपी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट रस्ते व पक्की नाली बांधकाम केले जाणार असुन यात अंबीका चौक ते अर्जूननगर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, राजीवगांधी चौक ते व्यकंटेश स्कुल कर्परा नदी पुल , राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा ते खोलवाट सिमेंट रस्ता, बार्शी रोड ते दिप हॉस्पीटल  ते रिपोर्टर भवन सिमेंट रस्ता, जालना रोड ते कासर  ते थिगळे नाना कॉम्प्लेक्स , कासट ते  शहर पोलिस ठाणे ते आश्वीणी हॅास्पीटल सिमेंट रस्ता, मसरतनगर ते नेत्रधाम ते सावररकर चौक , शितल वस्त्र भांडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजुचे रस्ते, जालना रोड ते अमरधाम स्मशानभुमी बिंदूसरा नदी पुल पर्यंत,जालना रोड ते कॅनॉल रोड पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता, पेठ बीड पोलिस ठाणे ईदगाह ते नाळवंडी नाका , नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी , बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा,बार्शी रोड , मुक्ता लॉन्स ते तकीया मस्जीद ते फ्रुट मार्केट ते खासबाग देवी रोड लेंडी नाला , अंकुशनगर  ते पाण्याची टाकी सिमेंट रस्ता व नाली बांधकाम केले जाणार  आहे.अशा प्रकारे बीड शहरात आणखी पंधरा नवीन रस्त्याचे प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहेत.
या पत्रकार परिषदेस बांधकाम सभापती विनोद मुळूक, डॉ.योगेश क्षीरसागर,  नगरसेवक गणेश वाघमारे, गणेश तांदळे आदी उपस्थीत होते. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.