पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गैरहजेरी; चर्चांना उधाण

मुंबई :-

पंतप्रधान यांच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत.  आरोग्याच्या कारणास्तव हजर राहाता येणार नसल्याचं पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यात आलं आहे.  आज साडेचार वाजता पंतप्रधान कोविडसदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.  त्यामुळे या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. मात्र या निर्णयामधील कारणाबद्दल कोणताही खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला नाही.

देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आज चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र सहभागी होणार नाहीत.  

सध्या देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान,रविवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची परिस्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली तयारी, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती, ओमायक्रॉनचा वाढता प्रसार या सर्वांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि मिशन मोडवर प्रौढांसाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी, राज्यांची परिस्थिती, तयारी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली जाईल, असे त्यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्री घरुनच काम करत आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव मागील काही आठवड्यांपासून घरुनच काम करत आहेत. अनेक बैठकींना ते ऑनलाइन माध्यमातून घरुनच हजेरी लावत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचा मुद्दा चांगलाच गजला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून सध्या ते राज्याचा कारभार, महत्वाच्या आढावा बैठकींना घरुनच उपस्थिती लावतायत.

महाराष्ट्रासहीत या राज्यांमुळे चिंता वाढली

१९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिलीय.

 

लॉकडाउनसंदर्भात निर्णयाची शक्यता

सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीमधील केंद्र सरकारकडून कठोर निर्बंधांबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. निर्बंध कठोर करण्यासंदर्भात चर्चा करुन त्याबद्दल महत्वाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत घेतला जाईल असं म्हटलं जात आहे. या बैठकीमध्ये लॉकडाउनसंदर्भात विचार केली जाऊ शकतो अशीही चर्चा आहे. मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधानच घेतील असा दावा केला जातोय.

 

अधिक संसर्ग असणाऱ्या राज्यांसाठी वेगळे नियम?

दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये करोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा मोठी वाढ दिसून येत असल्याने करोना रुग्णसंख्या वाढणारी राज्ये आणि इतर राज्ये असे वेगळेवेगळे नियम लावण्यासंदर्भातील शक्यताही व्यक्त केली जातेय.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.