पुढील तीन महिन्यातील तपासणी शिबीरांचे नियोजन पुर्ण-डॉ.सुरेश साबळे
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील दिव्यांग बांधावांची आरोग्य तपासणी वेळेत व्हावी त्यांची अडचण होवू नये यासाठी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये आता प्रत्येक आठवड्यातून दोन वेळेस तपासणी शिबीर आयोजित केले जात आहे. गत 18 दिवसात या शिबीरांच्या माध्यमातून 678 दिव्यांग रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याच पद्धतीने आता प्रत्येक महिन्यात ठरवलेल्या तारखे दिवशी दिव्यांग रुग्णांची तपासणी तालुकास्तरीय शासकीय रुग्णालयात होणार आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली.
बीड जिल्ह्यात दिव्यांग रुग्णांची यापुर्वी आठवड्यातून तपासणी होत असे मात्र या रुग्णांना ताटकळत थांबण्याची वेळ येवू नये आणि सर्व रुग्णांची संबंधित डॉक्टांकडून तपासणी व्हावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच या रुग्णांची प्रत्येक महिन्यात ठरवलेल्या तारखेला तालुकास्तरीय रुग्णालयात तपासणी निश्चित करण्यात आली आहे. दि.14 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालय, माजलगाव ग्रामीण रुग्णालय, केज उपजिल्हा रुग्णालय, गेवराई उपजिल्हा रुग्णालय, आष्टी ग्रामीण रुग्णालय आणि परळी उपजिल्हा रुग्णालयात मिळून तब्बल 678 दिव्यांग रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या आगामी तीन महिन्यात दिव्यांग रुग्णांच्या तपासणीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या असून त्या त्या दिवशी संबंधित तालुकास्तरीय रुग्णालया रुग्णांची तपासणी होणार आहे.
Leave a comment