जिल्ह्यात 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये 1446 पाईंट

 

 

बीड | वार्ताहर

 

 

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  औरंगाबाद मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सुबाहू ई-बीट प्रणालीचा प्रकल्प बीड जिल्हा पोलीस दलात राबविण्यात येत आहे. 

 

सर्व बीटमध्ये मालाविरूध्द गुन्ह्याचे ठिकाणे, धार्मिक संवेदनशील ठिकाणे, मुख्य बाजारपेठा, वर्दळीचे ठिकाणे, सराफा लाईन, एटीएम व बँका, शाळा, महापुरूषांचे पुतळे इ.महत्वाच्या ठिकाणी पोलीसांची नियमीतपणे गस्त, वावर रहावा यासाठी ई बीट पेट्रोलिंग करण्यात येत आहे. यासाठी मागील 3 वर्षात घडलेल्या गुन्ह्यांचा लेखाजोखा जाणून घेवून त्यातून विशिष्ट ठिकाणे निवडून निश्चित करण्यात आले आहेत. 

 

भेटीयुक्त ठिकाणाचे अक्षांश रेखांश सॉफ्टवेअरद्वारे फिक्स करून ठिकाणांचा पेट्रोलिंगमध्ये समावेश करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये एकूण असे 1446 पाईंट तयार करण्यात आले आहेत. सदरची प्रणाली ही 20 ऑगस्ट 2021 रोजी पासून पुर्ण क्षमतेने 1446 पाईंटवर सुरु करण्यात आली आहे. पोलीस ठाणे प्रमुख यांनी बीट मधील अंमलदार यांना कर्तव्य वाटप केल्यानंतर संबंधित अंमलदार हे त्याठिकाणी पोहचून आपल्या मोबाईलद्वारे पंचिंग करतात. ई- बीटद्वारे पंचिंग केल्यानंतर संबंधित अंमलदार यांना स्वतः तसेच पोस्टे प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस नियंत्रण कक्ष यांना सदरच्या पेट्रोलिंग बाबतची अचूक माहिती मिळते. तसेच सर्व प्रकारची पेट्रोलिंग योग्य प्रकारे व वेळेत होत आहे. पोलीसांकडून नागरिकांना जलद प्रतिसाद मिळावा व गुन्हेगारांवर वचक रहावा या हेतूने सूबाहू अँप ची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे.ई - बीट वापराबाबत सर्व पोलीस अधिकारी-अंमलदार यांना प्रशिक्षण देवून सदरचे अॅप सर्व पोलीस अधिकारी - अंमलदार यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यात आले आहेत.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या  सुबाहू अँप ई- बीट प्रणालीचा प्रभावीपणे वापर सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार करत आहेत.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.