नवरात्रात मठामध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

 

माजलगाव । वार्ताहर

येथील सद्गुरू श्री मिस्कीनस्वामी मठामध्ये मठाधीपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या सानिध्यात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरूवात करण्यात आली. आश्विन शु.1 गुरूवारी दि. 7 रोजी शेकडो सुवासिनी आणि समाज बाधवांच्या उपस्थितीत गो-अश्व मिरवणूकीने गंगापूजन करून मठामध्ये आदीशक्ती पार्वती मातेस मिरवणूकीने आणलेल्या गंगाजलाने रूद्राभिषेक करून पारंपारिक पध्दतीने घटस्थापना करण्यात आली. मठाचे विद्यमान मठाधीपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्यांच्या नेतृत्वखाली या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य वे.मू. गंगाधरशास्त्री गजभार, महादेव स्वामी,शिवशंकर स्वामी, विजय कानडे स्वामी यांनी केले.

गुरूवारी सकाळी 11 वाजता मठाच्या आवारातून गो-अश्व मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. शहरालगत असलेल्या सिंधूनदीच्या पात्राची तसेच गाय आणि अश्व यांची विधिवत पूजा केल्यानंतर नगरप्रदक्षिणा करत सदरील मिरवणूक मठामध्ये विसर्जीत करण्यात आली. या वेळी सुवासिनी महिलांनी कलाशामध्ये आणलेल्या गंगाजलाने आदीशक्ती माता पार्वती - जगदंबेचा अभिषेक माजलगांव नगरीचे मानकरी विश्वनाथ शेटे यांच्या हस्ते करण्यात येवून विधिवत आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारदीय नवरात्रोत्सवाची घटस्थापना करण्यात आली.दरम्यान, माजलगांव मठाचे नूतन मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी देखील आपल्या नवरात्र तोपोनुष्ठानास प्रारंभ केला असून, या निमित्ताने दि. 7 ते 15 ऑक्टोबर पर्यंत मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रतिनित्य श्रीगुरूंची महापूजा, तीर्थी-प्रसाद, महाप्रसाद, दुपारी शिवपाठ व भजन, रात्री 9 वाजता शिवकीर्तन, त्यानंतर श्रीगुरूंचे आशीर्वचन आणि प्रतिनित्य जागर अशा धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. दि. 15 रोजी श्रीगुरूंची रजत पालखी सोहळा आणि दसरा दरबाराने या नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येणार असून, दसरा दरबारासाठी महाराष्ट्र राज्यसह कर्नाटक, तेलंगना आदी राज्यातून हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याचे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले. *कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनप्रणित लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीतच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन मठ व्यवस्थापन समितीचे बबनअप्पा खुर्पे, विलासअप्पा लांडगे, ओंकारअप्पा खुर्पे, सुचेंद्र महाजन यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.