.नमिताताई मुंदडा यांनी घेतला आढावा

 

तातडीने मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

 

अंबाजोगाई | वार्ताहर

 

गेल्या काही दिवसापासून  जिल्ह्यात केज,अंबाजोगाई, बीड व इतर तालुक्यात सातत्याने अतिवृष्टी झाली आहे. 23 सप्टेंबर रोजी रात्री केज व अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यात सध्याची भयंकर पूर परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना शेतजमीन, शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे प्रती हेक्टर 50 हजार रुपये शासनाने सरसकट मदत करावी व विमा कंपनीस १०० नुकसान नुकसान झाल्यामुळे १०० टक्के विमा रक्कम देण्याबाबत आदेश द्यावेत व राज्यमार्ग, वस्ती रस्ते, शेती रस्ते, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, पांदन रस्ते ल व पुलांचे दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणवर निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच घरांची पडझड झाली आहे त्याबाबत तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी केजच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. तत्पूर्वी आ.नमिता मुंदडा यांनी मतदार संघात झालेल्या नुकसानीचा विस्ताराने आढावा घेतला.

 

आज शुक्रवारी आ.नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 23 सप्टेंबरच्या रात्री अतिवृष्टी झाली आहे. नदी , नाल्यात महापूर आला आहे. पुलांवरून पाणी वाहत आहे. केज, कळंब , भूम, वाशी, चौसाळा, नेकनूर, भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा नदीला महापूर आला आहे. मांजरा प्रकल्पाचे दरवाजे उघडले आहेत. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे धरणाच्या वरील गावांतील शेतीत पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतजमिनीचे व सोयाबीन, ऊस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच मांजरा प्रकल्पाच्या खाली मांजरा नदीस अतिवृष्टीमुळे व मांजरा प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे महापूर आला आहे. त्यामुळे शेतजमिनीचे व शेतातील पिकांचे सोयाबीन, ऊस व खरीप हंगामातील सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यतील इतर सर्व नद्यांना महापूर आला आहे . सदरील नद्यांचे पाणी मांजरा प्रकल्पात व मांजरा नदी प्रवाहात जाते . परंतु आधीच मांजरा नदीला महापूर आल्यामुळे बाकीच्या नदीचे पाणी पात्रात घुसू दिले जात नाही सदर पाणी परत शेतीत घुसले आहे . त्यामुळे शेतजमिनीचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अंजनपूर , कानडीबोरगाव, बॅरेजचे दोन गेटचे नुकसान झाले आहे.

तसेच बीड जिल्ह्यातील राज्यमार्ग, वस्ती रस्ते , शेती रस्ते, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, पांदन रस्ते , व पुलांचे अत्यंत नुकसान झाले आहे . रस्ते व पुले नादुरुस्त झाले आहेत . कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम आहे. पिकले तर त्याला खर्चावर आधारित भाव ही मिळत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रत्यक्षात अतिवृष्टीमुळे नदी नाल्याला आलेल्या महापुराचे पाणी वाहून जाते त्यामुळे केज , अंबाजोगाई, बीड तालुक्यातील बुटेनाथ सह सोळा साठवण तलाव व वाण , होळना तसेच ईतर नद्यावर बॅरेजेस व बंधारे बांधणे आवश्यक आहे. वाहून जाणारे पाणी थांबवले तर अशी भयंकर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही व बारामहिने शेतीला पाणी मिळेल व पिण्याच्या पाण्याची सोय होईल त्यासाठी त्वरित मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे . तरी अतिवृष्टीमुळे पूर्ण बीड जिल्ह्यात नुकसान झाले आहे . परंतु केज मतदार संघातील केज , अंबाजोगाई , बीड तालुक्यात सध्याची भयंकर पूर परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यानां तातडीने मदत द्यावी अशी मागणीही आ.नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.