जालना । वार्ताहर
महाराष्ट्रातील महिलावरील अत्याचार थांबेपर्यंत राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नसल्याचा इशारा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.उषाताई पवार यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना जिल्हाधिकारी,जालना यांच्यामार्ङ्गत पाठविलेल्या निवेदनात दिला आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी,जालना यांच्या मार्ङ्गत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.उषाताई पवार, नगरसेवीका सौ.संध्याताई संजय देठे, स्वाती जाधव, लक्ष्मीबाई लहाने, जिल्हा चिटणीस स्नेहा जोशी, शहराध्यक्षा सिमा बिर्ला,अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ.यास्मीन शेख, शहर उपाध्यक्षा ममता कोंडयाल, प्रिती पालीवाल , वर्षा ठाकूर, शुंभागी देशपांडे, गिता राजगुडे, सुनिता चौधरी, अंजली नागोरे, कमला मिश्रा, डॉ.बरकात शेख,प्रदेश कार्यकारिणी सदस्य बद्रीनाथ पठाडे, जिल्हा सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते आदीची प्रमुख उपस्थीती होती.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षिचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्यचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरुच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पीटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणी विनयभंगाचे सत्रही सुरुच आहे. भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडीत महिलांच्या कुटूंबीयांना, स्थानीक पोलीस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांना सदर घटनांबदल निवेदन पाठविले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शीष्टाई देखील मुख्यमंत्रयांनी दाखविली नाही. यावरुन हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रीय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारच्या प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही. वरील प्रमाणे सर्व वस्तुस्थीती असल्यामुळे भाजपा महिला मोर्चा , महाराष्ट्र प्रदेश तर्ङ्गे दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व संबधीत अधीकार्यांना निवेदन देऊन महाविकास आघाड सरकारच्या काळात कोवीड सेंटर्स व हॉस्पीटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा ङ्गोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलनही करण्यात आले होते, परंतु तरीही असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचल्यामुळे दिनांक 12 रोजी भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाने संपुर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणार्या अत्याचाराविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे, तरी महिला सुरक्षिततेबाबत त्वरीत बनविण्यात यावी. आपल्या जालना जिल्हयात देखील महिलावरील अत्याचारांच्या बर्याच घटना घडत आहेत. त्याबदृल देखील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येवून दोषीना त्वरीत दंडणीय करावी असे निवेदनात म्हटले आहे.
Leave a comment