माजी सरपंच उपसरपंच व सदस्यांची उपस्थिती

फर्दापूर । वार्ताहर

नवनियुक्त ग्रामपंचायत प्रशासक डि.एस साळूंखे यांचे दि.17 गुरुवार रोजी फर्दापूर (ता.सोयगाव) ग्रामपंचायत कार्यालयात मावळते सरपंच,उपसरपंच,सदस्य व पदाधिकार्‍यांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे मावळते उपसरपंच शेख सत्तार सदस्य रविंद्र बावस्कर,विलास वराडे,फिरोज पठाण,माजी सरपंच विठ्ठल आगळे,भीमराव बोराडे,राहुल दामोदर संगणक चालक सुरेश शेळके लिपीक गणेश वेल्हाळकर,जाकीर तडवी,तौसीफ शेख आदींची उपस्थिती होती, सन 2015 मध्ये निवडणून आलेल्या फर्दापूर ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणी ची मुदत दि.13 सप्टेंबर रोजी संपूष्टात आल्याने जि.प चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवलेकर यांच्या आदेशानुसार फर्दापूर ग्रामपंचायत कार्यालयात पुढील निवडणूक होईपर्यंत गावगाडा चालविण्यासाठी प्रशासक म्हणून सोयगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डि.एस साळूंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर डि.एस साळूंखे यांनी प्रशासक म्हणून फर्दापूर ग्रामपंचायतचा पदभार दि.14 सप्टेंबर रोजी स्वीकारला आहे.दरम्यान दि.17 गुरुवार रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणा नंतर फर्दापूर ग्रामपंचायतच्या मावळत्या सरपंच,उपसरपंच,सदस्य व आजीमाजी पदाधिकार्‍यांनी नवनियुक्त प्रशासक डि.एस साळूंखे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.