बळीराजा मोठ्या संकटात, नुकसानिचे पंचनामे करण्याची शेतकरी मागणी 

बदनापूर । वार्ताहर

तालुक्यातील रोषणगाव, गेवराई, शेलगाव, बदनापुर, दाभाडी,परिसरात काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा पाऊसाला सुरूवात झाली  मागिल पंधारवाड्यात संततधार पावसामुळे शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी साचल्याने व मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून परिसरातील  बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.

दरवर्षी मराठवाड्यातील शेतकरी सततचा दुष्काळात होरपळत असलेल्या बळीराजा यंदा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे . मार्च महिन्यात देश भरासह राज्य भरात कोरोणा व्हायरसच्या थौमानाने  देशभरात ताळेबंदी करण्यात आली व बाजार पेठा बंद ठेवण्यात आल्या परिणामी ङ्गळबागा , उत्पादक शेतकर्‍यांचे कवडीमोल भावाने आपले उत्पन्न  विक्री करावीं लागले उत्पादन खर्च सुद्धा ङ्गिटला नाही खरीप हंगामात  शेतकर्‍या  जवळील होती  नव्हती पुंजी संपूर्ण खरीप हंगामावर खर्च करून मोठ्या उत्साहाने शेती मशागतिला अतंर पिक मशागतीला सुरूवात केली पिकेही चांगल्याप्रकारे आली  पण निसर्गाच्या अवकृपेमुळे  व लहरी पणामुळे खरिप हंगाम हाताचा  गेल्याचे चित्र बदनापूर महसुल मंडळात व रोषणगाव महसुल मंडळात दिसत आहे. गेल्या काही  दिवसांपुर्वी  संततधार  पाऊसामुळे मुगाच्या शेंगांना कोमे ङ्गुटलेली होती मुगाचे पिक हाच्चे गेले असुन आठवड्याच्या विश्रांती नंतर पुन्हा संततधार पाऊसाचा सरी बरसण्यास सुरूवात झाली असल्याने परिसरात बाजरी व मक्का पिकांचा तोंडी आलेला घास हिरवतो कि काय अंशी चिंता बळीराजा ला लागली असुन  होते ची नव्हती पिकें जाते कि काय  चिंता शेतकर्‍यांना होत होती मंगळवारी दुपारी तीन  वाजेच्या सुमारास पाऊसाला सुरूवात झाल्यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होणारी शेतकरी आनंदात असुन  पाण्याचा निचरा न होणारे चिंतेत असल्याचे चित्र बाजार गेवराई सह  परिसरात पाहवयास मिळत आहे   मराठवड्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे  वरूणराजाची ही कृपा की अवकृपा कळायला मार्ग नाही हाताला आलेलं हिरवंगार पिकं डोळ्यासमोर जमीनदोस्त होताना शेतकर्‍याला काय वेदना होत असतील याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही  आशी अवस्था परिसरातील शेतकर्‍यांनची झाली आहे . परिसरातील विहिरींना  व बोअरवेल ला  क्षमतेपेक्षा जास्त पाणी आले असल्याने विहितून व बोअरवेलमधुन मोठ्या प्रमाणावर पाणी ओव्हरफ्लो होऊन पिकातुन वाहात असल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले असल्याने पिके निम्माहुन अधिक पिकें गेली असल्याने शासन दरबारी नुकसानिचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.