पाच गावातील लोक सहभागातून शिव रस्त्याचे काम  

तिर्थपुरी । वार्ताहर

घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा, भायगव्हाण, बाचेगाव, तिर्थपुरी व राहेरा या पाच गावातील लोकांनी आपले हेवेदावे बाजुला ठेवुन लोकसहभागातुन एक शिवरस्ता करणेचे पहिले उदाहरण करुन दाखवले तो हा पाच किलोमिटरचा शिवरस्ता. हा रस्ता वरील पाच गावांतील शेतक-यासाठी एक वरदान ठरणार आहे, मागील एक महिन्यापासून सामुहिक शिवरस्त्याचा कामासाठी स्वयंसेवकांनी तण-मन-धनाने दिवसरात्र करून पाच गावच्या लोकांना एकञ करून बैठका घेतल्या,शिवाची मोजणी मोजणदार कडून करण्यात आली. 

कैलास अंडील यांनी वेळोवेळी मदत,सहकार्य, मार्गदर्शन केले. भुमि अभिलेख, महसूल,पोलीस यंत्रणेचे विशेष सहकार्य मिळाले, कोणाच्या अडीअडचणी, गैरसमज दूर करण्यात आले, लोकवर्गणी जमा करण्यासाठी बैठकी झाल्या, बरीच लोकवर्गणी जमा देखील झाली, या रस्त्याचे उद्घाटन मा. नरेंद्र देशमुख तहसिलदार घनसावंगी यांच्या हस्ते करण्यात आले, या रस्त्याकरिता  भारतीय जैन संघटना यांनी जेसीबी मशीन व शासनाच्या वतीने पोकलेन मशिन पुरवण्यात आले आहे. यावेळी सर्वश्री बहुरे साहेब, अशोक शिंदे सर, सुनिल कोरडे, खडेकर अप्पा (पोलीस), अ‍ॅड कैलास जारे, पांडुरंग गिरे, एकनाथ करडकर, भिमराव रोडे, रमेश धांडगे, प्रकाश परदेशी, विठ्ठल पितळे, शिवा झाकणेस पप्पु झाकणे, दिलीपराव कोरडे, परमेश्वर कोरडे, रमेश एसलोटे, परमेश्वर कोरडे, श्रीकृष्ण एसलोटे, डाँ मिंधर, संभाजी मिंधर हे उपस्थीत होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.