स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांची सोय
सिल्लोड । वार्ताहर
कोरोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मोठ्या शहरातून गावी परतलेल्या विध्यार्थ्यांना अभ्यासाची उत्तम सोय व्हावी म्हणून दीडगाव येथील गावकरी लोकवर्गणीतून अद्यावत अभ्यासिका तयार करीत आहेत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे असा उपक्रम राज्यातील बहुधा पहिलाच असावा शासनादेशा नंतर ही अभ्यासिका सुरू केली जाणार आहे
दीडगाव सात आठशे उंबरठ्याचे गांव.गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षेचे कमालीचे वेड,गावातील एक तरुण सुरेश शेजूळ तहसीलदार झाला, ही प्रेरणा घेत विजय वडोदे, पूजा पांढरे पोलीस निरीक्षक झाले या गुणवंतांची प्रेरणा घेत गावातील जवळपास तीस चाळीस विध्यार्थी सिल्लोड, औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी शहरात एमपीएससी,यूपीएससी सह स्पर्धा परीक्षेनंतर्गत विविध पदांसाठी तयारी करण्यासाठी गेले होते मात्र कोरोनामुळे त्यांना गावी परतावे लागले, गावी आल्यावरही या तरुणांनी जिद्दीने अभ्यास सुरूच ठेवला. झाडाखाली,मंदिरात, जि.प.शाळेच्या वर्ग खोल्यात जिथे जागा मिळेल तिथे हे तरुण विध्यार्थी अभ्यास करीत असत ही बाब उपक्रमशील जि.प शिक्षक संचित धनवे, व धनंजय काटे यांनी पाहिली आणि त्यांना छत्रपती शाहू महाराजअभ्यासिकेची कल्पना सुचली.ही कल्पना गावकार्यांसमोर मांडली सर्वांनीच याचे स्वागत करून ही अभ्यासिका लोकवर्गणीतून बांधायचे ठरले पाहता पाहता देणार्यांचे हात पुढे आले, यात संचित धनवे, धनंजय काटे, तहसीलदार सुरेश शेजूळ, पोलीस निरीक्षक विजय वडोदे यांनी प्रत्येकी दहा हजार तर प्रा तानाजी मादळे यांनी पाच हजार रुपयांची वर्गणी दिली, सरपंच सरलाताई शेजूळ, ग्रामसेविका वर्षा डोंगरे यांच्यासह गावातील इतरांनी पण आर्थिक हातभार लावला आहे.
गावातच जिल्हा परिषदेच्या अनुदानातून1000 स्वकेर फुटाचा हॉल बांधण्यात आला आहे,शांत, वातावरणातील हा हॉल ग्रामपंचयातीने उपलब्ध करून दिल्याने जागेचा प्रश्न मिटला. यात अडीच बाय अडीचचे कप्पे केले असून एकूण चाळीस विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. यातील एक विभाग विद्यार्थिनींसाठी राखून ठेवण्यात आला आहे,फॅन,शुद्ध पिण्याचे पाणी,आदींची व्यवस्था केली जात आहे,अभ्यासिकेच्या देखभालीचा खर्च म्हणून विद्यार्थ्यांकडून नाममात्र फी घेतली जाणार आहे. अभ्यासिकेचे पर्यवेक्षण गावातील कल्याण शेजूळ,कृष्णा शेजूळ,प्रल्हाद शेजूळ,राम शेजूळ, प्रवीण शेजूळ,उषा शेजूळ,पूजा पांढरे,भारती शेजूळ हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विध्यार्थी स्वेच्छेने आठवड्यातील एकेक दिवस वाटून घेऊन मोफत करणार आहेत.
अभ्यासिकेत छोटेसे ग्रंथालय पण उभारले जाणार आहे त्यासाठी ग्रंथ प्रेमींना ग्रंथ दान करण्याचे आवाहन केले जाणार आहे अभ्यासिकेला गंजीधर शेजूळ यांनी स्वखर्चाने लोखंडी खिडक्या बसून दिल्या आहेत अभ्यासिका उभारणीसाठी उपसरपंच साहेबराव शेजूळ, दादाराव पांढरे,विलास शेजूळ, गंगाधर शेजूळ याच्यासह इतर गांवकरी पण झटत आहेत .भविष्यात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासिकेचा फायदा होणार आहे कोरोनामुळे सध्या अभ्यासिकेस बंदी आहे.
शासनाच्या आदेशानंतर ही अभ्यासिका सुरू केली जाणार आहे, गावातील विध्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेड लक्षात घेऊन छोट्याश्या गावात अभ्यासिका सुरू करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असावा. लोकडाऊन मुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विध्यार्थी गावी आले अभ्यासाची सोय नसल्यामुळे हे विद्यार्थी झाड, मंदिर,व जिल्हा परिषदेतील वर्ग खोली व अन्य ठिकाणी जिथे जागा मिळेल तिथे अभ्यासास बसत असत हे पाहून यांना अभ्यासासासाठी चांगले, शांत वातावरण मिळावे म्हणून अभ्यासिकेची कल्पना माझ्या मनात आली याला गावकर्यांनी उत्तम साथ दिली. (संचित धनवे, जि.प.शिक्षक)
Leave a comment