डाळीबांवर दिड लाख रुपये खर्चबाग तोडताना शेतकर्‍यांच्या डोळ्यांत अश्रू

पाचोड । विजय चिडे

डाळिंबवर पडलेल्या जीवाणूजन्य करपा (तेल्या रोग) रोगामुळे डाळींब उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. फळ विक्रीसाठी सज्ज झालेले असतानाच  संततधार पावसाबरोबरच डाळिंबावर हा रोग पडल्याने डाळींब उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.दरवर्षी शेतकर्‍यांना कायम अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकर्‍यांनी वैतागून डाळिंब झाडे जेसीबीने तोडून टाकले आहेत.

मुरमा ता.पैठण येथिल.महेश ज्ञानेश्वर लेंभे या शेतकर्‍यांनी गतआठ वर्षी पूर्वी एक हेक्टर क्षेत्रात 600 झाडे लावले होती.या बांगाचे संगोपन अतिशय योग्य पद्धतीने केले होते.परंतु  डाळिंबावर पडलेल्या जीवाणूजन्य करपा (तेल्या रोग) रोगामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.यामुळे याचा मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना त्यामुळे सहन करावा लागत आहे. शेतकरी महेश लेंभे यांनी सुमारे दिड लाख रुपये खर्च करत डाळिंबाची बाग उभी केली. यंदा या बागेतून त्यांना चांगले उत्पादन मिळणार होते. घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊन हाती चांगली रक्कम येईल, त्यातून पुढे आणखीन शेती विकास करू, घरसंसाराला रक्कम मिळेल, अशी आशा त्यांना होती. बागेत चांगली फळधारणा झाली. पण, तोच डाळिंबावर जीवाणूजन्य करपा (तेल्या रोग) पडला यामुळे लेंभेचे संपूर्ण अर्थिक गतिण कोलमडले तिन लाखांचे तरी उत्पन्न येईल, अशी अपेक्षा असतानाच आता झालेला खर्च निघेणे अवघड झाले आहे. त्यांना डागाळलेले कॅरेट डाळींब फेकून द्यावे लागले, तर काही कॅरेट बाजारात विक्रीस नेले असता त्यास कवडीमोल भावही मिळला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यातच संततधार पावसामुळे खरीप पिकावर मोठा परिणाम होत असून अडचणींत भर पडली आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी डाळिंब बाग तोडण्याचा निर्णय घेतला असुन संपूर्ण डाळीबेच्या  बागेवर जेसीबी फिरवून संपूर्ण डाळीबांचे झाडे उपटून फेकली आता शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

भरपाईची मागणी

रोगामुळे तसेच अतिरिक्त पाचोडसह परिसरातील 70 ते 80 टक्के डाळिंब खराब झाले असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. आधीच कोरोणा चे संकट, त्यात लॉकडाऊन काळात शेतमालास पडलेला फटका आणि आता डाळिंबावर आलेले संकट यामुळे अडचणी वाढल्या आहे.त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावीत. (महेश लेंभे-डाळींब उत्पादक शेतकरी.मुरमा.)

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.