तहसिलदार यांना लाल बावटाच्या वतीने ई-मेलव्दारे दिले निवेदन
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यात काल झालेल्या चक्री वादळी वार्यासह पावसाने झालेल्या ऊस पिकाचे त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानी पोटी आर्थिक मदत तात्तकाळ मिळणे बाबत विनंती पुर्वक वरील निवेदन ता.9 बुधवार रोजी केले आहे. लोकप्रतिनिधींनी बांधावर येऊन ऊसाची पाहणी करावी आणि मगच आदेश द्यावे असे शेतकर्यांचे म्हणने आहे.
पुढे निवेदनात म्हणटले आहे की, दि .6 व 7 सप्टेंबर रोजी घनसावंगी तालुक्यात झालेल्या झालेल्या चक्री वादळी वार्यासह पावसामुळे ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, ऊस पूर्ण खाली पडल्याने आता तो पूर्ण खराब झाला आहे. शेतकर्यांनी ङ्गार मेहनत करून खर्च करून पिकवला होता. उसाच्या पिकवरच शेतकर्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे, मशागतीच्या खर्च करण्यासाठी शेतकर्यांनी कर्ज काढलेले आहेत आता नुकसान झाल्याने ते कसे ङ्गेडायचे हाही प्रश्न निर्माण झाला आहे.एकंदरीत सर्व परिस्तिथी पाहता या शेतकर्यांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे. तरी मा साहेबानी याची दखल घेवून तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकर्यांना नुकसानी पोटी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आम्ही किसान सभा लाल बावटा च्या वतीने तहसिल दार यांना मेल व्दारे निवेदन देऊन करत आहोत तरी साहोत तरी साहेबांनी याची दखल घ्यावी. निवेदनावर कॉम्रेड गोविंद आर्द्ड सर्जेराव बरसाले, जनार्धन भोरेबाळराजे आर्द्ड, कुलदीप आर्द्ड बाळासाहेब राऊत, बजरंग तौर अंशीराम गणगे, अविनाश काळे रमेश शिंदे आदिच्या सह्या आहेत.
Leave a comment