46 गावकरी मुलींना 3 महिन्याचे मोबाइल रिचार्ज करुण आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

जालना । वार्ताहर

लायन्स क्लब ऑङ्ग जालना आणि श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांचा ऑनलाइन टीचिंग लर्निंग मोटिवेशनल प्रकल्प राबवून नाविन्यपूर्ण वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजसेवेचे अग्रदूत दुरुस्थ नेतृत्व असणारे वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचे मानकरी सेवा के साथ सेवा के लिये नेहमी सेवेसाठी तत्पर असणारे जालनाच्या रूपाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उपप्रांतपाल पद भूषविणारे लायन्स क्लब जालनाचे पुरुषोत्तम जयपुरिया यांचा 46 चा वाढदिवस श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय आणि लायन्स क्लब जालना यांच्यावतीने पदवी शिक्षण घेणार्‍या होतकरू मुलींसाठी ऑनलाईन टीचिंग लर्निंग मोटिवेशनल प्रकल्प राबवून साजरा करण्यात आला. 

कोरोना-19 महामारीने संपूर्ण जग थांबलेले असताना मागील 54 वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाची गरज लक्षात घेऊन सातत्याने आपल्या अखंड सेवा कार्यातून आदर्श निर्माण करणारे लायन्स क्लबने लायन्स क्लब इंटरनॅशनदच्या न्युवहासैस या उपक्रमांतर्गत महिला सबलीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करत कोरोना 19 त्यामुळे निर्माण झालेली शैक्षणिक अस्थिरता पालकांची मुलांना शिकवण्याची मानसिकता ऑनलाइन शिक्षणातील आर्थिक अडचाण महाविद्यालयात प्रत्यक्षात शिक्षण न घेता येणे या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना ऑनलाइन शिक्षणासाठी प्रोत्साहित करून शिक्षण पूर्ण करण्याची संधी देण्यासाठी ऑनलाइन टीचिंग लर्निंग प्रकल्पांतर्गत 46 विद्यार्थिनींना मोबाइल रिचार्ज उपलब्ध करून दिला. यावेळी लायन्स क्लब ऑङ्ग जालनाचे अध्यक्ष राजेश देवीदान, सचिव दिनेश लोहिया कोषाध्यक्ष राधेश्याम टिबडेवाल, झेड सी अरुण मित्तल, जीएसटी कोऑर्डिनेटर अतुल लड्डा, प्रकल्प प्रमुख सुरेश मुथा, शाम लोया, विजय दाड, द्वारकादास मुंदडा, सर्व लायन्स पदिा्थकान्यां सह महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोङ्गेसर डॉक्टर विजय नागोरी, प्रकल्प कॉर्डिनेटर उपप्राचार्य प्रोङ्गेसर डॉक्टर विद्या पटवारी डॉ. अहीरराव डॉक्टर काजी डॉक्टर महाजन आणि प्राध्यापकांची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना पुरुषोत्तमजी जयपुरिया यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून आणखीन काही सेवा प्रकल्प असल्यास तेही राबवू असे नमूद करत या महाविद्यालयांनी वेळोवेळी आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी अशी आशा व्यक्त केली. या वेळी अतुल लडा, अरुण मित्तल यांच्यासह प्राध्यापक डॉ. विजय नागोरी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सेवा कार्यात सातत्याने सहकार्य करू हा विश्‍वास दिला. यावेळी लॉयन्सचे राजेश देवीदान, अरुण मित्तल, अतुल लड्डा, द्वारकादास मुंदडा, राजेश भूतीया, एम.डी. खालापुरे, कामलबाबू झुणझुणवाला धनराज लोंढे पाटील, दिनेश लोहिया, राधेश्याम टीबरेवाल, बळीराम बेंद्रे, महावीर गिलडा, भारत मंत्री, कामलकिशोर बगडीया, श्याम लोया, राजेश लुनिया, आनंद अग्रवाल, सतीश पित्ती आदींनी आर्थिक सहकार्य केले. या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रोङ्गेसर डॉक्टर विद्या पटवारी यांनी केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.