सेनेचे उमेदवार निवडून द्या मी कामे करून दाखवतो- क्षीरसागर

 

शिरूर | वार्ताहर

शिरूर नगरपंचायत निवडणुकीत आपण केवळ जनतेच्या आग्रहाखातर सर्वच ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत आतापर्यंत शिरूर करांचा विश्वासघात केला परंतु यापुढे शिरूर चे महत्वाचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी आपण पुढाकार घेऊ जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याची ग्वाही देत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले

शिरुर कासार नगरपंचायत निवडणूक २०२१ साठी उर्वरीत ०४ जागे साठी शिवसेने कडून अधिकृत उमेदवार ०१ श्री.गोकुळ बबन थोरात ०२ श्री.वसंत गणपत काटे ,०९ सौ.स्वाती सागर केदार ११ सौ.हमिदा नवाब पठाण यांच्या प्रचारार्थ माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कॉर्नर बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या,यावेळी चारही उमेदवारांच्या वार्डात त्यांनी मतदारांशी संवाद साधला ते म्हणाले की, आतापर्यंत शिरूर शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी कुठले असे ठोस काम केलेले नाही त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला या प्रमाणे आजही शिरूरच्या नागरिकांना पाणी विकत घेऊन द्यावे लागते हे दुर्दैवी आहे सत्तेचा उपयोग जनहितासाठी करायला हवा जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे असते ग्रामीण भागाचा विकास आपण लोकशाही मार्गाने करू बीड शहराचा विकास ज्या पद्धतीने केला त्याच पद्धतीने शिरूर शहराच्या विकासासाठी आपण पुढाकार घेऊ शासनाच्या योजना खेचून आणाव्या लागतात त्यामुळे शिरूरच्या नागरिकांना आता हीच संधी आहे अनागोंदी कारभारामुळे शिरूर चा विकास खुंटला असून राज्य सरकारच्या योजना शिरूर मध्ये राबवायच्या असतील तर

 

शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा शिरूर येथे मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक प्राधान्य देऊन उमेदवार उभे केले आहेत जात पात धर्म पंथ व भेद न करता जो नेता नेतृत्व करतो त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे समस्या सोडवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत गरीब माणूस विमान कधी विकत नसतो त्यामुळे आश्वासने आणि भूलथापा मारून शिरूर च्या जनतेचा विश्वासघात करणाऱ्या लोकांना आता घरी पाठवा मी शिरूर चा विकास करून दाखवतो असे सांगून त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला चार ठिकाणी झालेल्या कॉर्नर बैठकांमध्ये शिरूरच्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडत शिवसेनेच्या उमेदवारांना विजय करण्याचे आश्वासन दिले

यावेळी  विलास बडगे,दिनकर कदम,बीडचे नगरसेवक मुखींद लाला,विलास विधाते,बाळू गुंजाळ,किशोर अप्पा पिंगळे,ऍड महेश धांडे,सुमित धांडे,नबील जमा,शाकेर जकेरीया,अर्जुन दादा गाडेकर गोपीचंद गाडेकर गोविंद काका गाडेकर युवराज सोनवणे कैलास गायके शेख रियाज सतीश काटे सागर भांडेकर अक्षय रणखांब महेश उगलमुगले महेश औसरमल ईझरुद्दीन शेख , मैनोद्दीन शेख शरद ढाकणे सुधाकर मिसाळ सुलेमान पठाण संतोष कंठाळे अशोक इंगळे संजय सानप सभापती उषा सरोदे मीनाताई उगलमुगले शोभा सरोदे वैशाली खंडागळे सुभाष काका शिरसागर शिवसेना तालुकाप्रमुखकिरण चव्हाण शहर प्रमुख बाळू तळेकर जिल्हा संघटक भरत जाधव , तय्यब पठाण युवा सेना तालुका अध्यक्ष.शेख बाबा,सुधाकर जाधव हसन शेख काशिनाथ थोरात बापू थोरात,उपस्थित होते

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.