विहामांडवा | वार्ताहर  

संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या या भीषण अपघातात मुस्ताक गुलाब कुरेशी( वय ४०) रा.विहामांडवा ता.पैठण जागीच ठार झाला. तसेच, दुचाकीवरील दुसरा सिराज रहेमान शेख वय( ३४ ) हा गंभीर जखमी झाला. ही घटना पैठण येथे घडली. विहामांडवा ता.पैठण येथील मुस्ताक कुरेशी आणि सिराज शेख हे दोघे मित्र पैठणला काही कामानिमित्त गेले होते. तिथले कामे आटपून पैठणहून विहामांडव्याकडे दुचाकी क्रमांक एमएच २० बीबी २८४० वरुन गावाकडे परत येत हाेते. यादरम्यान पैठण शहागड रस्त्यावरील अपेगाव जवळील आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल समोर येताच, समोरुन आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात मुस्ताक कुरेशीच्या डोक्याला गंभीर मार लागून तो घटनास्थळीच गतप्राण झाला. पाठीमागे बसलेला सिराज शेख हा जखमी झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. हा अपघात घडताच मोठा आवाज झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तात्काळ खासगी वाहनाद्वारे पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मुस्ताक कुरेशी यास मयत घोषित केले. जखमी सिराज शेख यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच पैठण पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी दवाखान्यात मोठी गर्दी केली होती. मयत मुस्ताक यांच्या पश्चाताप आई, पत्नी, तीन लहान मुले असा परिवार आहे. या अपघाताने विहामांडवा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.