शिवसेना नेते अनिल देसाई यांनी केले कौतुक

बीड | वार्ताहर
सलग 35 वर्षापासून बीड शहराचे नगराध्यक्ष म्हणून डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात जे काम केले आहे त्यामुळेच त्यांना कार्यसम्राट नगराध्यक्ष म्हणून ओळखले जाईल असे कौतुकास्पद उदगार शिवसेना नेते खा अनिल देसाई यांनी काढले

के एस के महाविद्यालयाच्या सभागृहात गरजू महिलांना आर्थिक मदत बचत गटातील महिलांना कर्ज वितरण शिलाई मशीनचे वाटप निवारा बेघर येथील नागरिकांना मदत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार अनिल देसाई उपस्थित होते प्रारंभी भाषणात नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड शहराच्या विविध विकास कामांची माहिती दिली महिलांसाठी सुरू करत असलेल्या महाराष्ट्रातील एकमेव मॉल बाबत माहिती दिली, तसेच शहरातील गरजू महिलांच्या हाताला काम मिळवून दिल्याची माहिती देत बीड नगर पालिकेला प्रशासनात कशा अडचणी निर्माण केल्या जात आहेत याचीही व्यथा मांडली, यावर शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले की इथे आल्यानंतर नगराध्यक्षांनी केलेल्या सर्व कार्याची माहिती घेतली तेव्हा लक्षात आले बीड नगरीला कार्यसम्राट नगराध्यक्ष लाभले आहेत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावण्यासाठी त्यांचा सुरू असलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे बीड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला तर नगराध्यक्ष यांनी केलेले कार्य स्मरणात राहील असेच आहे त्यांनी व्यक्त केलेल्या समस्यांकडे आपण वैयक्तिक रित्या लक्ष घालून याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार आहोत शिवसेना काम करणारावर कधीच अन्याय होऊ देत नाही त्यांच्या या कार्याची नक्कीच दखल घेतली जाईल याबाबत प्रशासनाला देखील विचारणा करून बीड नगरपालिकेचे प्रश्न सोडवले जातील असे ते म्हणाले यावेळी सभागृहात महिलांची मोठी उपस्थिती पाहून अनिल देसाईंनी भरभरून कौतुक केले आणि अशा विकासप्रिय नेतृत्वाच्या पाठीशी जनतेने देखील खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले,यावेळी सर्व सभापती,नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.