बीड | वार्ताहर

 बीड तालुक्यातील पाली जवळ भीषण अपघातात दोन ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली , यामध्ये बीडमधील सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले आणि प्रसिद्ध व्हॉलीबॉल खेळाडु महेंद्र गायकवाड यांचे अपघाती दुःखद निधन झाले.

बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना प्रणीत महाराष्ट्र शिव-अंगणवाडी सेनेचे मराठवाडा प्रमुख दिलीप भोसले यांचे रात्री पाली जवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले.
नेहमी सामाजिक-राजकीय कार्यात अग्रेसर असताना इतरांनाही प्रोत्साहित करणारे दिलीप भोसले यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वीच  कोरोनाने उपचारादरम्यान निधन झाले होते, त्यांचे कुटुंब या दु:खातुन सावरत असतानाच  त्यांचा दुर्दैवी अपघात झाला.

असून कांबळे नावाची व्यक्ती गंभिर जखमी झाली आहे , MH - 22 5277 या क्रमांकाची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजका वर धडकल्याने प्रथमदर्शनी दिसत आहे. हे  तिघेही अंबाजोगाई येथून बीडकडे येत असताना हा अपघात झाला .

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.