शाळा सुरू करा पालक-शिक्षकांचे धरणे

 

 

आष्टी | वार्ताहर

 

बियरबार चालू, विवाह सोहळे, आंदोलने निवडणूका सर्व काही चालू मात्र शाळा बंद का आहेत, शाळेतच कोरोना होतो का? असा रास्त सवाल करत आज शुक्रवारी (दि.२३)  शाळा सुरु करा या मागणीसाठी पालक, शिक्षकानी एकत्र येत तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले.महत्वाचे म्हणजे काही राजकीय नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी युवा नेते जयदत्त धस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर हंबर्डे, सरपंच सावता ससाने, प्राचार्य सोपानराव लिंबोरे, प्राध्यापक राम बोडखे, शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष अजमुद्दिन शेख तसेच शेकडो पालक विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी आष्टी गटशिक्षणाधिकारी यादव सर नायब तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांना लवकर शाळा सुरू करा, गरिबाच्या मुलाच्या शिक्षणाची वाटोळे करू नका अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी जयदत्त धस म्हणाले आज कोरोनाच्या नावाखाली शाळा बंद अवस्थेत आहेत. कोरोना हा शाळेतच होतो की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडत आहे. मोठी हॉटेल्स, बियरबार सुरू आहेत. तसेच मोठ्या संख्येने विवाह सोहळे तसेच पक्षांचे कार्यक्रम होत आहेत, मग शाळेनेच काय केले शाळा लवकर सुरू करणे गरजेचे आहे. कारण ऑनलाइन शिक्षण पद्धती ही आत्ताच्या विद्यार्थ्यांना अधोगतीला नेणारी ठरत आहे .कित्येक मुले  मोबाईलमुळे मेंदू ₹विकारचे शिकार होत आहेत.एका सामाजिक संस्थेच्या सर्वेनुसार ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे लहान मुलांमध्ये बैठकीमुळे लठ्ठपणाचे प्रमाणदेखील वाढले आहे .हे ही धोक्याचे आहे त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू केली पाहिजे अशी आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी आहे असेही धस म्हणाले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.