केज | वार्ताहर
 
पुणे शहरातून बनावट चावी लावून पळवलेली कार आरोपीसह केज पोलिसांनी शुक्रवारी सकाळी मोठ्या शिताफीने पकडली.
 
या कारवाईत आरोपी परमेश्वर सिताराम विढे (25, रा. साकुड ता.अंबाजोगाई) व हेमंत भरत चौधरी (28, रा. रूपीनगर तळवडे, ता.हवेली जि.पुणे) यांना अटक करण्यात आली.
 
पुणे शहरातून अज्ञात आरोपीनी एक इको कंपनीची कार पळवल्याची माहिती पुणे पोलिसांनी बीड पोलिसांना दिली. त्यानंतर संशयित चोरांचे व वाहन यांचे मोबाईल लोकेशन हे केज तालुक्यातील पिंपळगाव फाटा येथे असल्याची माहिती सायबर ब्रँचचे पोलीस नाईक अनिल मंदे याना मिळाली. मंदे यांनी तात्काळ ही माहिती केज ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली. नंतर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोर सापळा लावला. पोलीस जमादार नागरगोजे, पोलीस नाईक अनिल मंदे, महिला पोलीस नाईक धायगुडे, महिला पोलीस शिपाई जाधव यांनी बीडकडून अंबाजोगाईकडे जाणारी  संशयित कार क्र. ( एमएच-14/जीक्यू- 2229 ) अडवली. कारमधील दोन संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान  पुणे परिसरात चोरी झालेली कार केज पोलिसांनी शिताफीने पकडल्यामुळे केज पोलिसांचे कौतुक होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.