बदनापूर-पोळ्याच्या पूर्वसंध्येला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी  कत्तलीसाठी जाणाऱ्या 11 गाईंची सुटका केली आहे. त्यासोबत पाच वासरांची ही सुटका झाली आहे. 

बदनापूर-वार्ताहर     

  बदनापूर पासून जवळच असलेल्या सोमठाणा रोडवर आज सायंकाळी चार वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी खाजगी वाहनांच्या माध्यमातून बदनापूर परिसरात गस्त घातली. यादरम्यान त्यांना गुप्त माहितीच्या आधारे काही गोवंश कत्तलीसाठी जात असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी बदनापूर सोमठाणा रस्त्यावर सापळा लावला  चार वाजेच्या सुमारास दाभाडी कडून एक आयशर क्रमांक एम एच 18 बीजी 0853 हा येत असल्याचे दिसले. या वाहनाला थांबून चालकाची चौकशी केली असता त्याने योगेश मधुकर पाटील वय 34, राहणार तामसवाडी, जिल्हा जळगाव. त्याचा सहकारी महेंद्र पाटील राहणार तामसवाडी जिल्हा जळगाव .आणि तिसरा इम्रानखान उस्मानखान, राहणार गुलाबपुरा तालुका उरडा जिल्हा भीलवाडा (राजस्थान) ही नावे सांगितली.  आयशर मधील जनावरांविषयी विचारले असता सदरील गोवंश अकबर कुरेशी, पिंपरी ,तालुकाजिल्हा औरंगाबाद .येथे कत्तल करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. दरम्यान जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता वाहनांमध्ये जर्सी, गावरान, संकरित अशा विविध प्रकारच्या 11 गाई आढळून आल्या. त्याच सोबत पाच वासरे होते. दरम्यान या जनावरांना निर्दयीपणे वाहनांमध्ये कोंबूननेले जात होते. यामुळे यापैकी एका सात- आठ महिन्याच्या वासराचा गळफास लागून मृत्यू झाला आहे. या वासराची उत्तरीय तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कृष्णा तगे, सुधीर वाघमारे, सचिन राऊत, यांनी केली.याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गजानन भवरे  यांनी  दिलेल्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.