एपीआय ठाकरे विरोधात ऑनलाइन तक्रार

 

परतूर | वार्ताहर  

 साईनाथ मंदिर जवळच्या जागेला रामप्रसाद राऊत हे रविवारी माजी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनंतराव बागल यांच्या उपस्थितीत तार फेन्सिंग करत असताना ही जागा सार्वजनिक असल्याचे सांगत माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया व इतरांनी याला आक्षेप घेतल्याने त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता, पोलिसांनी एकतर्फी हस्तक्षेप करत राऊत व बागल यांना दमदाटी केल्याने या प्रकरणाला आता नवे वळण प्राप्त झाले आहे.

   बागल यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार नसतांना एपीआय रवींद्र ठाकरे यांनी बागल यांना पोलिस व्हॅन मध्ये बसवून ठाण्यात घेऊन गेले व दमदाटी केल्याने हायकोर्टातील वकील ऍड.विशाल बागल यांनी एपीआय ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालक यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे.यात त्यांनी एपीआय ठाकरे यांच्या या प्रकरणातील पक्षपाती भूमिकेची चौकशीची मागणी केली आहे.
     साईनाथ मंदिर विवादाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की साईनाथ मंदिर जिथे आहे ती जमीन स्व.बाबुराव राऊत यांची असून त्यांनीच हे मंदिर बांधले असे कागदोपत्री पुरावे देत बाबूराव राऊत यांचा मुलगा रामप्रसाद राऊत यांचे म्हणणे आहे. तर बनावट कागदपत्रांच्या आधार घेऊन मंदिराचे तत्कालीन पुजारी स्व.सायन्ना वंगुर यांनी ही वादग्रस्त जमीन मंदिराच्या नावे करून नोंद केली असा आरोप रामप्रसाद राऊत यांचा आहे, परतूर न्यायालयाने स्व.सायन्ना वंगुर यांच्या वारसदार विरोधात मनाई हुकूम ही काढलेला आहे. असे असतांना या पडीत जागेवरून हायवेवर जाण्यासाठी नागरिकांनी शॉर्टकट्स रस्ता वापर सुरू झाल्याने रामप्रसाद राऊत यांनी सदर जागेवर कुंपण घालण्याची रीतसर परवानगी नगरपरिषद परतूर कडे मागितली होती व पोलिसाकडेही यासाठी संरक्षण देण्याची मागणी केली होती  पण त्याकडे जाणिपूर्वक दुर्लक्ष केल्याने राऊत यांनी रविवारी बागल यांच्या उपस्थितीत तार कंपाउंड चे काम सुरू केले असे रामप्रसाद राऊत यांचे म्हणणे आहे.
       या प्रकरणात माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी हस्तक्षेप केला असून ही वादग्रस्त जागा देवस्थान ची सार्वजनिक असल्याचे म्हटले आहे. या जागेचा कोर्टातYH निकालही पुजारी वंगुर च्या बाजूने लागल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागते का आणखी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.