को-विन संकेतस्थळावर केवळ नोंदणी;अपाईन्टमेंट मिळेना

बीड । वार्ताहर

महाराष्ट्र दिनापासून 18 ते 44 वयोगटासाठी आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या लसीकरणापूर्वी या वयोगटाला ऑनलाईन नावनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे, दरम्यान नोंदणी करुनही अनेकांना लसीकरणाची अपाईन्टमेंटच मिळत नसल्याचे समोर आले. लशीच्या तुटवड्यामुळे दररोज केवळ 200 डोस दिले जात आहेत, शिवाय ऑनलाईन नोंदणी करताना लसीकरण केंद्र अवघ्या काही मिनिटात ‘फुल्ली बुक’ होत असल्याने तरुणाईमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या तरुणाईकडून लशीसाठी नावनोंदणी होऊनही जिल्ह्यात केंद्रच मिळत नसल्याने अडचणीचे ठरत आहे. बीड रहिवासी असलेले तरूण जिल्ह्यात मिळेल त्या केंद्रांवर लस घ्यायला जात असल्याने स्थानिक आणि बाहेरुन येणार्‍यांमध्ये वाद वाढले आहेत. शहरातील तरूण ग्रामीणमध्ये, तर ग्रामीणमधील शहरामध्ये असे चकीत करणारे चित्र ऑनलाईन केंद्र निवडीमुळे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या बाबी लक्षात येत असल्या तरी सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने त्यांनाही कसला हस्तक्षेप करता येत नाही. शिवाय ऑनलाईन नोंदणीदरम्यान लसीकरण केंद्र काही क्षणात बुक होत असल्याने अनेकांना लशीची अपाईन्टमेंट मिळेनाशी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने नावनोंदणीचा स्लॉट जाहीर करताच तरुणाई सायंकाळपासून मोबाइल घेवून नोंदणीसाठी बसतात.परंतू लसीकरण केंद्रावर क्लीक करण्याआधीच केंद्र बुक होऊन जात असल्याने शिवाय आता सिक्युरिटी कोडचा नवा ऑप्शन आल्याने तो टाकेपर्यंत केंद्र बुक होत असल्याने अनेकांनी या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली असून लस पुरवठा वाढवून दररोजचे लसीकरणही वाढवावे अशी मागणी होत आहे.

 

गुरुवारच्या लसीकरणासाठी आज दुपारी 2 वाजेपासून ऑनलाईन नोंदणी

18 ते 44 वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोविड लसीकरण सत्र तालुक्याच्या ठिकाणी सुरु असुन या वयोगटाकरीता 8700 कोविशील्ड लस लससाठा प्राप्त झाला आहे.आता जिल्ह्यातील एकूण 12 केंद्रावर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या लशीचे प्रतिदिन 200 डोसेस याप्रमाणात लसीकरण केले जाणार आहे. सध्या 11 मे पर्यंतची नोंदणी पुर्ण झाली असून दि.12 मे रोजीच्या लसीकरणासाठी 10 मे रोजी सांयकाळी 6 वाजता नोंदणीसाठी स्लॉट ओपन झाले होते. तसेच गुरुवारच्या (दि.13)लसीकरणासाठी लस साठा उपलब्ध असेपर्यंत दररोज दुपारी 2 वाजता स्लॉट ओपन केला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली.

12 सेंटरवर दोन्ही लशी उपलब्ध

 स्वा.रा.ती.वै.म अंबाजोगाई, चंपावती प्राथमिक शाळा, बीड, उपजिल्हा रुग्णालय, केज, जि.प.जुनी इमारत , गेवराई औष्णिक विद्युत केंद्र, परळी  ग्रामीण रुग्णालय , आष्टी या ठिकाणी कोविशील्ड लस उपलब्ध आहे. तसेच चंपावती प्राथमिक शाळा , बीड, ग्रामीण रुग्णालय, धारूर, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव, ग्रामीण रुग्णालय ,पाटोदा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरूर, प्राथमिक आरोग्य केंद्र,वडवणी येथे कोवॅक्सीन लस उपलध केली जाणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.