आष्टी । वार्ताहर

कोवीडच्या कालावधीत अन्टीजन टेस्ट किटचा तुटवडा हा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.माञ यामुळे साहजिकच टेस्ट होत नाहीत शिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांची खरी आकडेवारी या किट्स उपलब्ध नसल्याने समोर येत नाही.याच पार्श्वभूमीवर आ.सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघासाठी 40 हजार अन्टीजन किट्स उपलब्ध करुन दिल्या आहेत.

 

 

 

आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगांव व आष्टी तालुका दुध संघ यांच्या वतीने आष्टी तालुक्यात अन्टीजन टेस्ट करणार्‍या सहा टिम तयार केलेल्या आहेत.त्यामुळे या टिमच्या माध्यमातून आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अन्टीजन टेस्टचे कम्प होत आहेत.माञ मध्यंतरी प्रशासनाच्या वतीने अन्टीजन किट्सचा तुटवडा जाणवू लागल्याने टेस्टची प्रक्रिया थांबल्याचे चिञ होते.याच पार्श्वभूमीवर आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून मच्छिंद्रनाथ देवस्थान व आष्टी तालुका दुध संघ यांच्यावतीने 40 हजार अन्टीजन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्याने आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यात रविवार दुपारपासून अन्टीजन कम्पला सुरुवात देखील झाली.या आलेल्या 40 हजार अँटीजन टेस्ट किट्स आ.सुरेश धस यांच्या उपस्थितीत तहसिलदार राजाभाऊ कदम,सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,ना.तहसिलदार प्रदिप पांडूळे,युवानेते सागर धस,सुनील रेडेकर, शरद रेडेकर  माऊली जरांगे,सागर धोंडे,डा.नागेश करांडे यांच्या हस्ते अन्टीजन टेस्ट करणार्‍या टिमकडे सुपुर्द करण्यात आल्या.

कोरोना संकटात आ.सुरेश धसांचे योगदान महत्वाचे- माऊली जरांगे

सध्या कोरोणाच्या महामारीत काहीच पुरत नाही प्रशासनाकडे  अ‍ॅटिजन टेस्ट किट उपलब्ध नाहीत तर आ सुरेश धस यांनी तातडीने मच्छिंद्रनाथ देवस्थानची बैठक घेऊन खाजगी किट खरेदी करून प्रशासन व देवस्थान याचां समन्वय साधून राञी निर्णय घेऊन पुर्ण राञ जागुन आज तीन वाजता टेस्ट सुरू केल्याने आ सुरेश आण्णा धस यांचे अपत्कालीन सकंटातील योगदान महत्वाचे ठरत आहे असे प्रतिपादन माऊली जरांगे यांनी वहाली येथील शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.  कॅम्पमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर अवघ्या 115 रुपयांत चाचणी करून मिळणार आहे.  तरी ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे असतील व जे लोक पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहन आ सुरेश आण्णा धस यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जारांगे यांनी केले याप्रसंगी भारत मानमोडे, पंडित मानमोडे, संतोष सरोदे, गोवर्धन सुळे, शरद सुळे, सह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.