कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडेकोट नाकाबंदी 

एसपींचे पोलीस यंत्रणेला आदेश
 

बीड । वार्ताहर

इतर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्यो कमी होत असून बीड जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढत आहे. कोरोनामुळे जिवीतहानीसुध्दा होत आहे.ती होऊ नये म्हणून आपण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी रविवारी जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रभारींना दिले आहेत. तसेच नाकाबंदीमध्ये काय व कशी कारवाई करायची याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार  जिल्हा अंतर्गत चेकपोस्टच्या ठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये पोलीस विभागाचे पोलीस 1 अधिकारी 2 पोलीस अंमलदार 2 होमगार्ड महसूल विभागाचे 2 कर्मचारी अशा प्रकारे मनुष्यबळ कर्तव्यावर नियुक्त केले गेले आहे. चेकपोस्ट व नाकाबंदी पॉईंटवरील अधिकारी कर्मचारी हे विनाकारण फिरणान्या इसमावर जिल्हाधिकारी बीड यांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करतील. रेमडेसिवर इंजेक्शन हे तहसीलदार यांच्यामार्फत संबंधित रुग्णालयात उपलब्ध होत असल्याने सदर इंजेक्शन आणण्यासाठीचा बहाना करणार्‍या इसमावर नाकाबंदीदरम्यान कारवाई करतील. मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी, तपासणी करण्यासाठी जात असल्याचे सांगणारे इसमाकडे डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शनची तपासणी करुन योग्य ती कारवाई करायची आहे  लसीकरणासाठी जात असल्याचे सांगणारे इसमाचे मोबाईलमध्ये लसीकरण संबंधीचा शासकीय संदेश असल्याची खात्री करुन सदर शासकीय संदेशांमधील लसीकरणाच्या तारखेची खात्री करुन कारवाई करायची आहे. कोणीही इसम विनाकारण फिरत असल्याची खात्री झाल्यावर सदर इसमास चेकपोस्ट, नाकाबंदी पॉईटवर थांबून ठेवुन संबंधित पोस्टे प्रभारी अधिकारी यांना माहिती द्यावी व सदर इसमाची कोरोना तपासणी त्या ठिकाणी भरारी पथकाला बोलावून घेऊन करून घेतील. तसेच नमुद इसमावर योग्य ती कारवाईसुद्धा करतील. लसीकरणासाठी जात असल्याचे सांगणार्या इसमांनासुद्धा नाकाबंदी, चेक पोस्टच्या ठिकाणी थांबवून घेवुन पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकास बोलावून घेऊन आरटीपीसीआर, अँटीजन तपासणी करून घेतील. प्रत्येक नाकाबंदी, चेकपोस्टच्या ठिकाणी पूर्ण रोड ब्लॉक होईल अशा पद्धतीने बॅरिकेट्स लाऊन घेतील. नाकाबंदीचे ठिकाणी जे मोटारसायकल व इतर वाहन चालक चलन भरणार नाहीत अशा दुचाकी व इतर वाहने पोलीस ठाण्यात जमा करतील असेही आदेश एसपींनी दिले आहेत.

 

 

 

नाकाबंदी पॉईट व चेक पोस्टवरील सर्व अधिकारी, कर्मचारी , अंमलदार यांनी सोबत लाठी बाळगणे अनिवार्य आहे. सर्वजण मास्क , सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करतील सोशल डिस्टंसिंगचे पालन करून इतर कोविड नियमांचेसुध्दा पालन करतील व स्वतःचा कोरोनापासून बचाव करतील. नाकाबंदीच्या ठिकाणी येणार्या प्रत्येक इसमाचे आधार कार्ड चेक करतील. आधार कार्ड वरील पत्ता दूरचा असल्यास सदर इसम एवढ्या दूर का आला याची खात्री करतील व त्यावर कारवाई करतील, 15. नाकाबंदी पॉईट ,चेक पोस्टच्या ठिकाणी तपासणी केलेल्या वाहनांच्या नोंदणीसाठी एक रजिस्टर रजिस्टरमध्ये तारीख,वाहन नंबर ,चालकाचे नाव, चालकाचा आधार नंबर, वाहनातील इसमांची संख्या,तपासणी करणार्या अंमलदाराचा बक्कल नंबर , चेकिंग अधिकान्याची सही इत्यादी तपशिलाच्या नोंदी अचूकपणे घेतील. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाकाबंदी चेकपोस्टवर कसुन तपासणी केल्याशिवाय कोणालाही सोडायचे नाही. नाकाबंदीचे ठिकाणी कोणीही गप्पा मारत उभारणे,कामात दिरंगाई कुचराई करणे असे आढळल्यास त्याचा कसुरी आहवाल संबंधीत प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी , चेकिंग अधिकारी यांनी पाठवायाचा आहे. 21. नाकाबंदीचे ठिकाणी कसून आणि कठोर तपासणी करण्यामुळे लांब रांग लागली तरी चालेल परंतु विना तपासणी करता कोणालाही सोडायचे नाही. एकंदरच लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करायची आहे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग आणि दररोज वाढणान्या कोरोनाच्या केसेस कमी होतील. नाकाबंदी व चेक पोस्टचे ठिकाणी हजर असलेल्या अधिकारी व अंमलदार यांनी वरील सूचनांचे तंतोतंत पालन करावे यात हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी पोलिसांना दिले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.