तहसीलदार, डीवायएसपी, आरोग्य अधिकारी, पोलीस रस्त्यावर 

केज । वार्ताहर

विनाकारण नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त नागरिकांना आळा बसावा म्हणून प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. स्वतः तहसीलदार डीवायएसपी, तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी रस्त्यावर उतरून कार्यवाही केली. विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या लोकांची पोलीस चेकपोस्टवर अँटिजेन टेस्ट सुरू केली असल्याने बर्‍याच प्रमाणात आळा बसला आहे.

केज शहरातील गर्दी आणि विनाकारण वाढणारी गर्दी यावर नियंत्रण घालण्यासाठी तहसीलदार डी. सी. मेंडके यांनी आता एक अभिनव उपक्रम राबविला आहे. त्यांच्या सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, नायब तहसीलदार लक्ष्मण धस, सचिन देशपांडे नगर पंचायतचे कार्यालयीन अधीक्षक होटे, सेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, श्रीकृष्ण नागरगोजे, प्रा हनुमंत भोसले व आदर्श पत्रकार संघाचे सचिव गौतम बचुटे हे उपस्थित होते. पोलीस आणि आरोग्य विभाग व स्थानिक नगर पंचायतीच्या मदतीने केज येथील शिवाजी चौकात अडवून त्यांची थेट रॅपिड अँटिजेन टेस्ट करायला सुरुवात केली. जर त्यात पॉझिटिव्ह आढळला तर त्याची रवानगी थेट कोरोना केअर सेंटरमध्ये आणि योगायोगाने निगेटिव्ह आढळला तर साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी दंडात्मक कार्यवाही सुरू आहे. तसेच या अँटिजेन टेस्ट करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना तपासणी केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ किरण साखरे, डेटा ऑपरेटर शिंदे सचिन, राहुल पटेकर यांनी तपासणी केली.दिवसभरात एकूण 175 जणांची तपासणी करण्यात आली. त्या पैकी 14 जण पॉझिटिव्ह आढळले. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 8 हजार 100 रु. दंड वसूल केला असून पोलिसांनी देखील विनापरवाना फिरणार्‍या वाहनावर कार्यवाही केल्या.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.