बदनापूर । वार्ताहर
जालना जिल्हयासह औरंगाबाद व इतर आजूबाजूच्या जिल्हयात नवसाला पावणारी देवी म्हणून सोमठाणा येथील रेणुका माता पंचक्रोशीत प्रसिध्द असून या देवीची नवरात्रात नऊ दिवस मोठी यात्रा भरते यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सदरील यात्रा होणार नसल्याचे कळवण्यात आले आहे. निसर्गरम् वातावरणात डोंगरावर हे मंदिर असून डोंगराच्या पायर्थ्याशी अप्पर दुधना प्रकल्प असून गडावरील वातावरणही अतिशय प्रसन्न व हिरवेगाव असते. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील डोंगरावर रेणुकादेवीचे मंदिर आहे. परिसरातील व्रध्द भाविकांच्या मते देवी येथे स्वयंभू निर्माण झाली असून सतयुगात महादेव व पार्वती गमन करण्यासाठी या डोंगरावर आले असता पार्वतीला हा परिसर आवडल्याने त्यांनी येथेच वास्तव्य करण्याचा हटट धरला. सोमठाणा येथील डोंगरावरच स्वयंभू होऊन स्थिरावले. रेणुकामाता हे पार्वतीचेच रूप आहे, असे मानले जाते. रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशीच महादेव मंदिर असून येथील पिंड प्राचीन अशी आहे. काही भाविकांच्या मते साक्षात ब्रमहदेवाने माता रेणुकीची स्थापना केलेली असून याचे वर्णन रामायणात आलेले आहे. 
या ठिकाणी जगदंबा व तुळजा भवानीचेही मंदिर आहे येथे अश्‍विन महिन्यात नवरात्र आणि चैत्र महिन्यातील पौर्णिमेला उत्सव साजरा केला जातो. नवरात्रातील नऊ दिवसांत भाविक डोंगरावर छोटया-छोटया राहुटया ठोकून येथेच राहतात. या डोंगरावर अति प्राचीन तळे असून त्यात अंघोळ केल्याने आत्मशुध्दी होऊन दुर्धर आजार नष्ट होतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती असल्याने मराठवाडयासह महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातील भाविक सातवी माळीनिमित्त येथे गर्दी करतात. डिसेंबर 1991 मध्ये राजेंद्र जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली येथे रेणुकामाता व महादेव संस्थानची स्थापना करण्यात आली. त्यानंतर येथील देवस्थानाचा विकासाला वेग आला असून या ठिकाणाला पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळालेला आहे. संस्थानच्या वतीने येथे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था, संरक्षक भिंत, वाहनतळ, भव्य सभामंडप, लॉन, भोजन कक्ष  आदी विकास कामे झालेली आहेत. येथील अनेक तरुण येथे स्वच्छता व साङ्गसङ्गाई मोहिम राबवितात.  या डोंगरावर  हिवराईचा शालू पांघरलेला असून निसर्गरम्य वातावरण येथे आहे. सोमठाणा डोंगराच्या पायथ्याशीच दुधना नदीवरील तालुक्यातील सर्वात मोठा अप्पर दुधना प्रकल्प असून सध्या हा प्रकल्प भरून सांडव्या वरून पाणी वाहत असल्यामुळे हे नयनरम्य दृश्य पर्यटकांना आर्कक्षित करत असले तरी. यंदाचा नवरोत्रोत्सव प्रशासनाने सुचवलेल्या मार्गदर्शन तत्वावनुसार होणार असून गडावर प्रत्येक वर्षी नऊ दिवस राहुटया करून उपवास करणार्‍यांनाही यंदा गडावर राहता येणार नाही. संस्थानच्या वतीने व्यापार्‍यांनाही दुकाने न लावण्याचे तर  भाविक भक्तांनाही गडावर न येण्याचे आवाहन केले असून गडावरील देवीची पूजा-अर्चना व दैनंदिन कार्यक्रम पुजार्‍यांच्या उपस्थित करण्यात येणार असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व भाविक भ्कतांनी गर्दी न करण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र जैस्वाल यांनी केलेले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.