सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्य

जालना । वार्ताहर

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 100 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर  राजपुतवाडी -2, गांधीचमन -1, एस.आर.पी.एफ. निवासस्थान -1, प्रियदर्शनी कॉलनी -1, देवपुर -1, भाटेपुरी -1, हिवर्डी -1, मंठा तालुक्यातील वाघाळा -1, घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा -4, वाचेगाव -1, अंबड तालुक्यातील महेबुब नगर -1, गणपती गल्ली -1, म्हाडा कॉलनी -1,सोनक पिंपळगाव -1,मठ तांडा -1, दाढेगाव -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, खापरखेडा -2, धाकरवाडी -1,जाफ्राबाद तालुक्यातील आदर्श नगर -4, खासगाव -1, जानेफळ पंडीत -1, हनुमंतखेडा -2, भोकरदन तालुक्यातील   पिंपळगाव रेणुकाई  -2, सुभानपुर -1, पिंपळगाव -1, जळगाव सपकाळ -2, वालसा डावरगाव -3 इतर जिल्ह्यातील मेहकर -4, मेहरा खु. ता. चिखली -1, काकडा जि. बुलढाणा- 1,सिंदखेडराजा -2, देऊळगावराजा -1, मेव्हणाराजा -1, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दारे 51  व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 46 व्यक्तींचा अशा एकुण 97 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13325 असुन सध्या रुग्णालयात-266 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4644, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-334, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-45944 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -97(टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-7046 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-37761, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-491, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4145

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-42, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-4020 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-86, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-505, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-33, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-266,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-59, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-100, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-5387, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1473 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-84233, मृतांची संख्या -183. जिल्हा सामान्य रुग्णालयात  तट्टुपुरा परिसरातील 55 वर्षीय पुरुष, जालना शहरातील प्रयाग नगर परिसरातील 70 वर्षीय महिला, वाघाळा ता. सिंदखेडराजा येथील 74  वर्षीय पुरुष, केनवड जि. वाशीम येथील 70 वर्षीय महिला, दरेगाव ता. जालना येथील 65 वर्षीय पुरुष जानेफळ ता. भोकरदन येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकुण सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.